नमस्कार सगळ्यांना...
माझ्या तमाम मित्र-मैत्रिणींनो, माझे हितचिंतक, माझी काळजी करणारे ते सगळे, तुमच्या सदिच्छानीं मी लवकरच बरी होईल यात तिळमात्र शंका नाही. आणि यातच एक आनंदाची बातमी😍
माझ्या आई-पप्पांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. कोरोनाने गलत आदमी सें पगा लिया हैं। हे कोरोनाला समजल्यामुळे तो आपल्या आई- पप्पांपर्यंत पोहचला नाही याचा खूप खूप आनंद आहे. माझ्या आजीने माझा रिपोर्ट आल्यानंतर चीन आणि कोरोनाच्या 7 पिढ्यांचा उद्धार काढत कोरोनाला खूप शिव्या घातल्यात तो भाग वेगळा😁
खरं तर आज, कालची संपूर्ण दिवसाची दगदग, धावपळ, आणि जगात भारी KDMC यावर लिहलेली पोस्ट आणि कोरोना झालेल्यांना काय झेलावं लागतं याविषयी लिहणार होते.. मात्र ही गुड न्युज मिळाली आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला...
बाकी कोविड सेंटर हे बिगबॉस हाऊसप्रमाणे वाटतंय मला😊 सगळे अनोळखी लोकं, इथे प्रत्येकाला जिकायचं आहे. मात्र कोणा दुसऱ्या- तिसऱ्या माणसाला हरवून नाही. तर इथे प्रत्येकाचा शत्रू एकच आहे "कोरोना" आणि माझ्यासारखे सगळेच वरच्या बिगबॉसने दिलेला हा टास्क पूर्ण करतायेत. टास्क पूर्ण होणार आणि आम्ही जिंकणार😎
बाकी मगाशीच हाऊसकीपिंगवाले काका म्हणाले
" काय घाबरायचं या चिनी रोगाला ? डोळे मोठे करून दाखव त्या कोरोना फोरोनाला😀
क्रमशः
#कोरोना_डायरी
